पारनेर शहरात कोरोना मुक्त अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:19 AM2021-05-14T04:19:52+5:302021-05-14T04:19:52+5:30
पारनेर : घरा-घरात रॅपिड ॲंटिजन टेस्ट करून पारनेर शहर कोरोनामुक्त अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शहरात वैदू वस्ती, ...
पारनेर : घरा-घरात रॅपिड ॲंटिजन टेस्ट करून पारनेर शहर कोरोनामुक्त अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शहरात वैदू वस्ती, शाहूनगर, इंदिरानगर, बोलकोबा गल्ली, कोर्ट गल्ली, संभाजीनगर, आनंदनगर परिसरातील रुग्णसंख्या वाढत आहे. येथे तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी पारनेर शहर कोरोना मुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून भैरवनाथ गल्ली, वरची वेसपासून तहसीलदार ज्योती देवरे यांनी अभियान सुरुवात केली. प्रत्येक गल्लीत घराघरात जाऊन रॅपिड चाचणी करण्यात येत आहेत. यात पॉझिटिव्ह आढळून आल्यास लगेच उपचार सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कोरोनामुक्त शहरासाठी उपयुक्त असल्याने नागरिकांकडून या अभियानाचे स्वागत होत आहे.
130521\img-20210513-wa0008.jpg
पारनेर शहर कोरोना मुक्त अभियानास गुरुवार पासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रत्येक गल्लीत घरात जाऊन रॅपिड चाचणी करण्यात येत आहे