मनपाचा १३० कोटींचा कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:16+5:302021-03-08T04:21:16+5:30

अहमदनगर : कोरोनाच्या पाश्वभूमीवर महापालिकेने ७५ टक्के शास्तीमाफी दिली होती. ही सवलत डिसेंबरपर्यंत होती. या काळात ५२ कोटी इतका ...

Corporation owes Rs 130 crore | मनपाचा १३० कोटींचा कर थकीत

मनपाचा १३० कोटींचा कर थकीत

अहमदनगर : कोरोनाच्या पाश्वभूमीवर महापालिकेने ७५ टक्के शास्तीमाफी दिली होती. ही सवलत डिसेंबरपर्यंत होती. या काळात ५२ कोटी इतका कर वसूल झाला. चालू वर्षात मात्र कर वसुली मंदावली असून, शहरातील ७१ हजार मालमत्ताधारकांकडे १३० कोटींचा कर थकला आहे. त्यामुळे मनपाने पुन्हा वसुलीची मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेची अर्थिक स्थिती बिकट आहे. गतवर्षी कोरोनामुळे कर वसुली ठप्प होती. थकीत कर वसुल व्हावा, यासाठी तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ७५ टक्के शास्ती माफी जाहीर केली. त्यामुळे गेल्या नोव्हेबर व डिसेंबर या दोन महिन्यांत ४४ हजार ५९९ मालमत्ताधारकांनी ५२ काेटी ८४ लाख इतका करत भरला. शास्तीमाफीमुळे अनेक प्रकरणे निकाली निघाली. कोरोनाच्या संकट काळातही नागरिकांनी शास्तीमाफीचा लाभ घेत घरपट्टी व पाणीपट्टी भरली. त्यानंतर मात्र करवसुली मंदावली. सध्या दररोज १० ते १२ लाख इतका भरणार होत आहे. दरम्यान, महापालिकेचे नवे आयुक्त शंकर गोरे यांनी वसुलीचा आढावा घेतला. वसुली मोहिमेला गती देण्यासाठी दररोज एक कोटी करवसुलीचे उद्दिष्टे दिले आहे. परंतु, सध्या कोणतीही सवलत नसल्याने वसुलीला फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे करवसुलीचे मोठे आव्हान मनपाच्या वसुली विभागासमोर आहे.

महापालिकेचा चालू वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. परंतु, वसुलीअभावी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पही कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

...

एकूण मालमत्ताधारक

१०,१६०००

निवासी- ७५,६००

अनिवासी-१३,७७९

ओपन प्लॉटधारक- २७,०००

...

थकीत मालमत्ताधारक

७१,४०१

.....

कर भरलेले मालमत्ताधारक

४४, ५९९

...

नोव्हेंबर व डिसेंबरमधील वसूल कर

५२ कोटी ८४ लाख

...

एकूण थकबाकी

१३० कोटी

...

६ कोटी ७९ लाख ऑनलाइन जमा

लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली. शहरातील १० हजार ६०० मालमत्ताधारकांनी सहा कोटी ७९ लाख इतका कर मनपाच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केला.

...

चार प्रभागातील शंभर मालमत्ताधारकांना नोटिसा

महापालिकेच्या चारही प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागातील सर्वाधिक थकबाकी असलेल्या पहिल्या १०० मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्याचा आदेश आयुक्त गोरे यांनी दिला आहे.

Web Title: Corporation owes Rs 130 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.