नागरदेवळे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; सदस्याचा जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:58 PM2018-03-06T13:58:22+5:302018-03-06T14:00:12+5:30

सुमारे १५ लाखांच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Corruption in Nagaredevale Gram Panchayat; A member of the Zilla Parishad attempted suicide | नागरदेवळे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; सदस्याचा जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

नागरदेवळे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; सदस्याचा जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदनगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतमध्ये रस्त्यांची कामे न करताच पूर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास बीले अदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे १५ लाखांच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी सकाळी महेश झोडगे रॉकेल घेऊन जिल्हा परिषदेत आले़ त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनात प्रवेश केला. तेथे झोडगे यांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत झोडगे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.


२७ फेबु्रवारी रोजी महेश झोडगे यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना पत्र देऊन ग्रामपंचायतीतील घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ही कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. झोडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम कॉलनीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण (खर्च १० लाख), अंतर्गत गटारीचे काम (खर्च २ लाख ५० हजार) या दोन्ही कामांचा पुर्णत्वाचा दाखला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता व विभागीय अभियंता यांच्या स्वाक्षरीने १ सप्टेंबर २०१७ रोजी देण्यात आलेला आहे. याशिवाय १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मधुरानगरी येथे २ लाख ५० हजार खर्चुन रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण केल्याचा दाखला १० आॅगस्ट २०१७ रोजी देण्यात आलेला आहे. या पुर्णत्वाच्या दाखल्यांमुळे संबंधित कामांची बीलेही काढण्यात आलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र पुर्णत्वाच्या दाखल्याच्या दिनांकापूर्वी आणि त्यानंतर आजपर्यंत प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कामे सदर ठिकाणी झालेले नाहीत. त्यामुळे या कामांची बोगस बीले काढून संबंधित अधिकारी, ठेकेदार व त्यांच्या इतर साथीदारांनी गैरव्यवहार करत सरकारी निधीचा अपहार केलेला आहे. या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करुन संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी झोडगे यांनी केली होती.

Web Title: Corruption in Nagaredevale Gram Panchayat; A member of the Zilla Parishad attempted suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.