बंधारे तुडुंब भरल्याने देवकौठे झाले पाणीदार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:00 AM2020-09-15T11:00:41+5:302020-09-15T11:01:35+5:30
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या देवकौठे गावांमध्ये अकरा सिमेंट बंधारे बांधले. भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडुंब भरल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या देवकौठे गावांमध्ये अकरा सिमेंट बंधारे बांधले. भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडुंब भरल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून भोजापूर धरण पूरचारीचे पाणीही पिंपळे तलावामार्गे देवकौठे पर्यंत पोहोचले. पावसाचे पाणी व भोजापूर चारीचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे मधील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. तसेच सुमारे १४ वर्षांनी देवी नदीही वाहती झाली, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. मागील वर्षीही मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूर चारीचे पाणी देवकौठे पर्यंत आले होते. याही वर्षी हे पाणी आणण्यासाठी मार्केट कमिटीचे संचालक भारत मुंगसे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे, भागवतराव आरोटे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, अशोक मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, अण्णासाहेब शेवकर, नामदेव कहांडळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. थोरात कारखान्याच्या वतीने भोजापूर चारीचे पाणी तळेगाव पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असून दमदार पावसामुळे देवकौठेत आलेल्या मुबलक पाण्याने तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यांमुळे सर्वत्र हिरवाई पसरली असून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
|