मळणी यंत्रात अडकुन विवाहीत तरूणीचा मृत्यु. चिखलठाण येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:22 PM2020-09-14T12:22:48+5:302020-09-14T12:26:01+5:30
म्हैसगाव : मळणी यंत्रात अडकूण विवाहीत तरूणीचा मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारी घडली . गंभीर स्थितीत उपचार चालु असतानाच रात्री उशीरा तीचा मृत्य झाला .विजया वैभव काकडे (वय २४ वर्ष ) असे मृत पावलेल्या विवाहीत तरूणीचे नाव आहे.
म्हैसगाव : मळणी यंत्रात अडकूण विवाहीत तरूणीचा मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारी घडली . गंभीर स्थितीत उपचार चालु असतानाच रात्री उशीरा तीचा मृत्य झाला .विजया वैभव काकडे (वय २४ वर्ष ) असे मृत पावलेल्या विवाहीत तरूणीचे नाव आहे .
विजया काकडे ही आपल्या शेतातील बाजरीचे दाणे इतरांच्या मदतीने ट्रकरच्या साह्याने चालणाऱ्या मळणी यंत्राद्वारे काढत होती . चाळणीवर साचलेले काड काढण्यासाठी गेली असता डोक्याला बांधलेले फडके ट्रक्टर व मळणी यंत्राला जोडलेल्या शॉफ्ट मध्ये गुंडाळले गेल्याने ती ही गती असलेल्या शाफ्ट कडे ओढुण त्यामध्ये अडकली.
मशीनला असलेल्या वेगवान गती मुळे शॉफ्ट बरोबर तीही वेगवान गती ने फिरून जमीनीवर जोरदार पणे आदळली यामुळे डोक्याला गंभीर जखम होवुन हात पायाला जोरदार मार लागला. अवस्थेत तिला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयामध्ये हलवले .त्या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार चालु असताना मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने व उपचाराला साथ न मिळाल्याने तीचा मृत्यु झाला . तीच्या मागे एक तीन वर्षाची व एक अकरा महीन्याची अशा दोन मुली आहे .