दीप फाउंडेशनच्या वतीने कागल येथे निर्मित केलेल्या लेक्चर कॅप्चर स्टुडिओमध्ये अत्याधुनिक तांत्रिक साधनांच्या मदतीनं ए.टी.एल. ई-लेसन्सची निर्मिती केली जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या ८० विषयतज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. एका विषयाला ३ किंवा ४ असे जवळपास २० उच्चशिक्षित विषय शिक्षक मिळणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थी शिकण्यासाठी फक्त त्यांच्या वर्गशिक्षकांवर किंवा विषय शिक्षकांवर अवलंबून असणार नाहीत. हा देशातील पहिला प्रयोग असून कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना या लेक्चर कॅप्चर स्टुडिओ तसेच ऑनलाइन शाळा ॲपच्या मदतीने डिजिटल शिक्षणाचे धडे गिरविता येणार आहेत. कोविडनंतर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतरदेखील हा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना वरदान ठरणार आहे.
-----------------
गुंड डिजिटल बोर्डाचे सल्लागार
निघोज (ता. पारनेर) येथील संदीप गुंड हे दीप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून डिजिटल स्कूल संकल्पनेचे प्रणेते आहेत. भारत सरकार सल्लागार ऑपरेशन डिजिटल बोर्डचे सल्लागार आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे गुंड यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-----------
फोटोओळी - २७दीप फाउंडेशन
दीप फाउंडेशनच्या ऑनलाइन शाळा व्हर्च्यूअल अकॅडमी व ऑनलाइन शाळा या सॉफ्टवेअर व्हर्जनचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व दीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप गुंड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.