याबाबत कावळे यांनी शनिवारी मंत्री वडेट्टीवर यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरती, बँक भरती, एम.पी.एस.सी., यूपीएससीची सर्वच्या सर्व प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे. ही प्रक्रिया लवकर सुरू करावी. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची अभ्यास आणि तयारी करीत आहेत. घरापासून शहराच्या ठिकाणी बाहेर राहायचे म्हणजे महिन्याला सहा-सात हजार रुपये खर्च येतो. सर्व विद्यार्थ्यांचे पालक शेती, ऊसतोडणी करून काटकसर करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च करीत असतात. काही विद्यार्थी स्वतः काम करून अभ्यास करत आहेत, परंतु परीक्षेची अनिश्चितता कायम आहे. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतलेले आहेत. मात्र त्यावरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे प्रश्न मार्गी लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
--
फोटो- २७ कावळे
फोटो- स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कावळे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.