जागा खरेदीत विश्‍वासात न घेतल्याने माध्यमिक सोसायटी विरोधी संचालक व सभासदांची निदर्शने

By चंद्रकांत शेळके | Published: September 19, 2023 05:50 PM2023-09-19T17:50:42+5:302023-09-19T17:50:53+5:30

पारनेर तालुक्यातील सर्व सभासदांचा मेळावा घेऊन त्यांच्यासमोर जागेचा प्रश्‍न मांडावा व त्यानंतरच सोयीची जागा खरेदी करण्याचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

Demonstrations by directors and members against the secondary society for not being trusted in the purchase of seats | जागा खरेदीत विश्‍वासात न घेतल्याने माध्यमिक सोसायटी विरोधी संचालक व सभासदांची निदर्शने

जागा खरेदीत विश्‍वासात न घेतल्याने माध्यमिक सोसायटी विरोधी संचालक व सभासदांची निदर्शने

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने पारनेर शाखेची जागा सभासदांना विश्‍वासात न घेता खरेदी करण्याची कार्यवाही चालविल्याच्या निषेधार्थ विरोधी संचालक व सभासदांनी पारनेर शाखेसमोर निदर्शने केली. पारनेर तालुक्यातील सर्व सभासदांचा मेळावा घेऊन त्यांच्यासमोर जागेचा प्रश्‍न मांडावा व त्यानंतरच सोयीची जागा खरेदी करण्याचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात सोसायटीचे विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडखे, सभासद बाळासाहेब निवडुंगे, बापूसाहेब होळकर, अमोल ठाणगे, राहुल झावरे, जयवंतराव पुजारी, भगवान राऊत, विजय पठारे आदी सहभागी झाले होते. सत्ताधारी संचालकांनी मनमानी कारभार करुन परस्पर जागा खरेदी केल्यास सर्व तालुक्यातील सभासद एकत्र करुन जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

या जागा खरेदीसाठी एकदा निविदा काढून संचालकांच्या बैठकीत निविदा उघडण्यात आल्या. त्याच बैठकीत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधील निविदा एकाच व्यक्तीच्या होत्या. सध्या ज्या जागेवर शाखा कामकाज पाहते त्याच ठिकाणची जागा घेण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळाचा अट्टाहास होता. परंतु संबंधित जागा गैरसोयीची आहे. केवळ आर्थिक हितापोटी सत्ताधारी संचालकांनी ती जागा खरेदीचा घाट घातला आहे. या गैरकारभाराविरोधात सर्व सभासदांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाणार आहे. 

Web Title: Demonstrations by directors and members against the secondary society for not being trusted in the purchase of seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.