मिरजगाव : कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र मांदळी येथे एका तरुणाचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला. शोभाचंद रामदास शिंदे (वय ३५), असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण थंडी-ताप येत असल्याने मिरजगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. तीन दिवसांनंतर काहीच सुधारणा होत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नगरमध्ये दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी मंगळवारी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. केवळ योग्य वेळी निदान न झाल्याने या तरुणास जीवनाला मुकावे लागले. या घटनेची आरोग्य विभागाला खबरबातही नाही. गावोगावी आरोग्य विभागाकडून विविध आजारांची कागदोपत्री माहिती घेतली जाते. अशा संसर्गजन्य आजाराचा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. (वार्ताहर)
डेंग्यूंसदृश्य आजाराने तरुणाचा मृत्यू
By admin | Published: October 07, 2016 12:31 AM