वंचित बहुजन आघाडीतर्फे बसस्थानकात स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:11+5:302021-02-24T04:22:11+5:30
अहमदनगर : संत गाडगे महाराज यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी व जय हिंद युवक मंडळ शीला विहार ...
अहमदनगर : संत गाडगे महाराज यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी व जय हिंद युवक मंडळ शीला विहार यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथील तारकपूर बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता करून गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.
या मोहिमेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण, भाऊ साळवे, मनोज कर्डिले, अमर निरभवणे, राहुल कांबळे, विशाल थोरात, जयहिंद युवक मंडळाचे शशिकांत दळवी, अजय दळवी, अभिजीत दळवी, अभिजीत बल्लाळ, संत गाडगे महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश दळवी आदी उपस्थित होते. तारकपूर बसस्थानक सफाई कर्मचारी यांना ग्लोज, सॅनिटायझर, मास्क देण्यात आले. संपूर्ण तारकपूर बस स्थानक स्वच्छ करून सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. तारकपूर बस स्थानकाचे प्रमुख परदेशी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे उपक्रमाबद्दल कौतुक केले.---
फोटो- २३ वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नगर शहरातील तारकपूर बस स्थानकात स्वच्छता केली.