अहमदनगर: स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा येथील महसूल पथकाने मंगळवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीवरील चिंचणी धरणात वाळूतस्करांच्या चार बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या़ यावेळी पोलिसांना पाहून वाळूतस्कर पळून गेले़चिंचणी धरणाच्या बॅकवाटर परिसरात काही वाळूतस्कर बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना मिळाली होती़ माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी महसूल पथकालाही माहिती देण्यात आली़ घटनास्थळी १२ लाख रुपये किमतीच्या चार यांत्रिक बोटी आढळून आल्या़ या बोटी घटनास्थळीच जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या़पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरुट, संतोष लोढे, रणजित जाधव, संदीप घोडके, रोहित मिसाळ तसेच तहसीलदार महेंद्र माळी, कामगार तलाठी जयसिंग मापारी यांच्या पथकाने ही कारवाई केली़
वाळूतस्करांच्या चार बोटी नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:37 AM