धनगर आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा : सुमित्रा महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:17 PM2018-05-31T19:17:56+5:302018-05-31T19:18:58+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एकतारी गुण आपण जीवनात अंगिकारला पाहिजे. धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल. ज्या मल्हारराव होळकरांचे व आहिल्यादेवींची आपण नाव घेतो त्यांच्या विचाराचे रक्षण करूनच आरक्षण मागितले पाहिजे' असे मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एकतारी गुण आपण जीवनात अंगिकारला पाहिजे. धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल. ज्या मल्हारराव होळकरांचे व आहिल्यादेवींची आपण नाव घेतो त्यांच्या विचाराचे रक्षण करूनच आरक्षण मागितले पाहिजे' असे मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा २९३ वा जयंती महोत्सव साजरा झाला. यावेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणपतराव देशमुख होते.
महाजन म्हणाल्या, अहिल्यादेवींच्या जीवनातील एक तरी गुण आदर्श मानून प्रत्येकाने जीवन जगले पाहिजे. अहिल्यादेवींनी आपल्या जीवनात सुखा पेक्षा दु:ख च जास्त पहिले तरी त्या कर्तव्य करीत राहिल्या. आमच्या मवाळ प्रांतात त्यांना सर्व जातीधर्माचे लोक आई मानतात. तुमच्या तालुक्यातील जन्मलेली एक मुलगी ही इंदोरची सुभेदारीन झाली. इंग्रजांनाही आपल्या मुठीत ठेऊन जगासमोर एक दीपस्तंभ म्हणून उभी राहिली.
स्वागताध्यक्ष पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, चौंडी मध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासकीय कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देणार असून त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आरक्षण विधेयकाची प्रकीया सुरू असुन शासन प्रयत्नशील आहे, असा विश्वास शिंदे यांनी दिला.
यावेळी पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णा डांगे, खासदार विकास महात्मे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, नारायण पाटील, दत्तात्रय भरणे, रामहारी रूपनवर, नारायण कुचे, आमदार भीमराव धोंडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, नानासाहेब पाटील, रमेश शेंडगे, पोपट गावडे उपस्थित होते.