ड्रोन मॅपिंग करुन पिकांचे पंचनामे करा : राधाकृष्ण विखे यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 04:35 PM2019-08-06T16:35:27+5:302019-08-06T16:36:46+5:30
भीमा आणि घोड नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदी काठच्या शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
श्रीगोंदा : भीमा आणि घोड नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदी काठच्या शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरगस्त भागाचे ड्रोन मॅपिंग सिस्टीमचा वापर करून पिकांचे पंचनामे करून शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तहसीलदार महेंद्र महाजन यांना दिले.
विखे पाटील यांनी काष्टी निमगाव खलु, आर्वी, अनगरे, अजनुजमधील भेट देऊन पुरगस्त भागाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, सदाअण्णा पाचपुते, शहाजी हिरवे, बाळासाहेब गिरमकर, विठ्ठलराव काकडे, सुवर्णा पाचपुते, सचिन कोकाटे उपस्थित होते.