शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
3
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
4
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
5
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
6
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
7
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
8
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
9
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
10
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
11
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
12
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
13
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
14
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
15
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
16
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
17
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
18
मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना
19
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
20
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल

व्यायामाअभावी मधुमेहाचे रुग्ण वाढले

By admin | Published: March 13, 2016 11:48 PM

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे.

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे. वेदनारहित आजार असल्याने तो कळायच्या आतच माणसाचा घात करतो, असे प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी केले.मधुमेहाचा आजार टाळण्यासाठी नगर येथील स्टार जनरल केअर अ‍ॅण्ड आयसीयू युनितटर्फे मधुमेह आजार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत रविवारी सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात व्याख्यान आणि तपासणी शिबिर झाले. त्यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास डॉ. रावसाहेब अनभुले, डॉ. रणजित सत्रे, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. श्रावणी कवडे, अपर्णा चव्हाण यांची उपस्थिती होती.मधुमेहाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. बहुरुपी म्हणाले, मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला एखादा अवयव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार सर्वात वाईट आजार आहे. युवा पिढीत आहाराचे अज्ञान आणि व्यायामाचा अभाव ही दोन कारणे हा आजार वाढण्यामागे आहेत. उपाशीपोटी १२६ च्या पुढे आणि जेवल्यानंतर २०० पेक्षा जास्त रक्तामध्ये साखर असेल तर मधुमेह झाला, असे समजावे. मधुमेहामुळे पहिल्यांदा डोळे खराब होतात आणि ते करोडो रुपये खर्च केले तरी बरे होत नाहीत. लघवी जास्त होेणे, जळजळ, जंतुसंसर्ग, अस्वस्थता, वजन कमी होणे, सतत खावेसे वाटणे आदी मधुमेहाची लक्षणे आहेत. यावेळी त्यांनी मधुमेहाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आहार आणि मधुमेह झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अपर्णा चव्हाण म्हणाल्या, मानसिक शांतीसाठी व्यायाम करावा. खाण्यावर, कामावर प्रत्येकाने मर्यादा घातल्यास ताण कमी होईल. यावेळी स्लाईड शोद्वारे मधुमेहाची तीव्रता लक्षात आणून दिली. शहरात लवकरच मधुमेह क्लब स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित सत्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)