कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्प रखडले : सदाशिव लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:25 AM2019-04-20T11:25:31+5:302019-04-20T11:28:05+5:30
कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्प खऱ्या अर्थाने रखडले.
संगमनेर : कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्प खऱ्या अर्थाने रखडले. ज्या प्रकल्पांची किंमत आठ कोटी होती. ती आज दोन हजार कोटींच्या पुढे गेली आहे, अशी टीका शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी, चिकणी, निमगाव-भोजापूर, राजापूर, गुंजाळवाडी, कºहे, निमोण, पारेगाव आदी गावांमध्ये शुक्रवारी खा. लोखंडे यांनी मतदारांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, भाजप तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, जयवंत पवार, संग्राम जोंधळे, संतोष कुटे, राजू सातपुते, रमेश काळे, भरत फटांगरे, सुधाकर गुंजाळ, बाळासाहेब राऊत, भाऊसाहेब हासे, शरद थोरात, इम्तीयाज शेख, रणजित जाधव, भारत शिंदे, अक्षय बिल्लाडे, कैलास कासार, सचिन साळवे, बाजीराव कवडे, दिलीप साळगट, संदीप सांगळे, चंद्रकांत घुगे, गणेश गडाख, भीमराज चतर, अमित चव्हाण, रावसाहेब डुबे, पप्पू कानकाटे आदी उपस्थित होते.
खा. लोखंडे म्हणाले, खासदार कधी दिसले नाहीत, असे बोलणारे दररोज मतदारसंघात आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते सत्तेत असून पाण्याचा एक थेंबही अडवू शकले नाहीत. निळवंडे धरणाबरोबरच भोजापूर व आढळा धरणाचाही प्रश्नही त्यांनी भिजत ठेवला.
भोजापूर धरणाची उंची वाढविण्याबरोबरच पूर चारीचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. निळवंडे धरणासारखीच भोजापूर धरणाची देखील उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोखंडे यावेळी म्हणाले.