गाय-म्हशींच्या खरेदीसाठी अर्थसाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:59 AM2018-06-15T10:59:12+5:302018-06-15T10:59:33+5:30

दुग्धोत्पादन हा एक परंपरागत शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र, आधुनिकीकरणाच्या झपाट्यात आता हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे.

Economy for purchase of cow-buffaloes | गाय-म्हशींच्या खरेदीसाठी अर्थसाह्य

गाय-म्हशींच्या खरेदीसाठी अर्थसाह्य

सचिन चोभे
अहमदनगर : दुग्धोत्पादन हा एक परंपरागत शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र, आधुनिकीकरणाच्या झपाट्यात आता हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. याच व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि पशुपालन मंत्रालयातर्फे शेतकऱ्यांना डेअरी उद्यमशीलता विकास योजनेतून अनुदान दिले जाते. ‘नाबार्ड’ मार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. राष्ट्रीयीकृत किंवा शेड्यूल्ड सहकारी बँक यांच्यामार्फत कर्ज घेऊन शेतकरी लाभार्थी होऊ शकतात. या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतक-यांना २५ टक्के, तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतक-यांना ३३.३३ टक्के अनुदान मिळते. १० गायींच्या खरेदीसाठी ६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरून शेतकºयांना हे अनुदान मिळू शकते. इच्छुकांनी नजीकच्या बँक शाखेत संपर्क साधून अर्ज करणे गरजेचे आहे. देशी आणि संकरित गायींच्या पालनासाठी मिळणाºया या अर्थसाह्यासाठी बचतगट, शेतकरी सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्याही अर्ज करू शकतात. यासाठी कर्जाच्या अर्जासमवेत बँकेकडे प्रकल्प अहवाल जमा करावा लागतो. या योजनेसाठी मिळणारे अनुदान एकूण कर्जाच्या नियमित परतफेडीवर मिळेल.
अनुदानाचा लाभ
कमाल प्रकल्प खर्च : ६ लाख रुपये
सर्वसाधारण प्रवर्ग : २५ टक्के
एससी-एसटी प्रवर्ग : ३३.३३ टक्के
-- शेतीवाडी --

Web Title: Economy for purchase of cow-buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.