व्यावसायिक शिक्षणातूनच उद्योजक निर्माण होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:59+5:302021-02-24T04:22:59+5:30

मालपाणी म्हणाले, आपल्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करायचे असेल ध्येयनिष्ठ आणि स्वतःशी वचनबद्ध असणे गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी ...

Entrepreneurs will be created only through vocational education | व्यावसायिक शिक्षणातूनच उद्योजक निर्माण होतील

व्यावसायिक शिक्षणातूनच उद्योजक निर्माण होतील

मालपाणी म्हणाले, आपल्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करायचे असेल ध्येयनिष्ठ आणि स्वतःशी वचनबद्ध असणे गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी व संघर्ष करण्याची पराकाष्टा यातूनच यशस्वी उद्योजक घडत असतो. केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगी नसून शिक्षणाबरोबरच व्यावसायिकतेची जोड असणे खूप गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता आपल्यातील कौशल्ये व आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योग स्थापन करावा. त्यासाठी वेगवेगळ्या उद्योजकांच्या यशोगाथा वाचन व प्रात्यक्षिक ज्ञानावर भर द्यावा. कोणत्याही कामाची लाज न बाळगता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत उद्योग-व्यवसायाकडे वळा.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवांतर्गत मिस्टर व मिस बी. व्होक, पोस्टर प्रेझेंटेशन, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये बी.व्होक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चिन्मय तिवारी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डी. एस. पचपिंड यांनी करून दिला. आभार प्रा.एस. टी. पवार यांनी मानले.

Web Title: Entrepreneurs will be created only through vocational education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.