शेतकरी कुटुंबातील नववधू हेलिकॉप्टरमधून सासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 05:10 PM2019-05-15T17:10:31+5:302019-05-15T17:10:35+5:30

राहाता तालुक्यातील साकुरी येथील शेतकरी कुटुंबातील नववधू चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना झाली. यामुळे हा विवाह सोहळा चांगलचा चर्चेत आहे.

 From the farmer's family, the bride helicopter sari | शेतकरी कुटुंबातील नववधू हेलिकॉप्टरमधून सासरी

शेतकरी कुटुंबातील नववधू हेलिकॉप्टरमधून सासरी

अहमदनगर : राहाता तालुक्यातील साकुरी येथील शेतकरी कुटुंबातील नववधू चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना झाली. यामुळे हा विवाह सोहळा चांगलचा चर्चेत आहे.

साकुरी येथे दंडवते यांची मुलगी अंजलीचा विवाह सोहळा काल थाटात पार पडला. साकुरी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात दंडवते आणि धानोरे (ता.शिरूर) येथील डफळे परिवारातील वधुवराचा लग्नसोहळा काल पार पडला होता. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान अचानक हेलिकॉप्टर मंगल कार्यालयासमोरील मैदानावर उतरले आणि व-हाडी मंडळी आणि नातेवाईकांमध्ये कुतूहल पहावयास मिळाले. दंडवते परिवार आणि डफळे परिवार सधन आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. मी आमच्या परिवारातील पहिली मुलगी आहे आणि परिवाराने माझी हवाई सफरीची इच्छा पुर्ण केल्याने मनस्वी आनंद होत आहे अस अंजलीने सांगितले तर वर राहुल याने अंजलीच्या परिवाराचे या अनोख्या भेटीच स्वागत करत धन्यवाद मानले. दंडवते हे सधन शेतकरी असल्याने त्यांनी लेकीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिले. अंजली आणि तिच्या पतीने साकुरी ते शिरूर अशी हवाई सफर केली.
 

 

Web Title:  From the farmer's family, the bride helicopter sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.