अकोले, बोटामध्ये युरिया खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 01:00 PM2020-07-06T13:00:38+5:302020-07-06T13:01:23+5:30
अकोले/ घारगाव : अकोले शहरातही सोमवारी सकाळी युरिया खतासाठी मोठी रांग लागली होती. पावसाच्या भुभुरमध्येही शेतकरी रांग लावून उ भे होते. प्रत्येक शेतकºयाला एक युरिया गोणी मिळत आहे.
अकोले/ घारगाव : अकोले शहरातही सोमवारी सकाळी युरिया खतासाठी मोठी रांग लागली होती. पावसाच्या भुभुरमध्येही शेतकरी रांग लावून उ भे होते. प्रत्येक शेतकºयाला एक युरिया गोणी मिळत आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा येथील एका कृषी सेवा केंद्रात युरिया खरेदी करण्यासाठी रविवारी (५जुलै) परिसरातील शेतकºयांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी तेथे जात शेतकºयांना फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे आवाहन केले.
पठारभागात सोयाबीन, लाल कांदा, भुईमूग, बाजरी, वाटाणे आदी पिकांची पेरणी शेतकºयांनी केली आहे. पिकांची वाढ व पोषण होण्यासाठी पिकाला वेळेवर खत देणे महत्त्वाचे असते. युरिया खताला शेतकºयांची मोठी मागणी आहे. मात्र, वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. बोटा येथील एका कृषी सेवा केंद्रात युरिया मिळत असल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. त्यामुळे कृषी सेवा केंद्राबाहेर युरिया खरेदी करण्यासाठी लांबवर रांगा लागल्या होत्या.
कोरोनाचा फटका छोट्या-मोठ्या सर्वच उद्योगांना बसला आहे. याला खत निर्मिती करणाºया कंपन्याही अपवाद नाहीत.
कंपन्यांमध्ये खत निर्मिती, वाहतूक व अन्य प्रक्रियेसाठी कामगारांची टंचाई भासत असल्याने युरिया खत लवकर उपलब्ध होत नाही, असे कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.