याबाबत मळेगाव (ता. शेवगाव) येथील सुनीता वाणी व सासेगाव (जि. नागपूर) येथील सोनू तिरमारे यांनी हे उपोषण सुरू केले असून, त्यांना इतर परिचालकांनी पाठिंबा दिला आहे. सर्व संगणक परिचालक महाराष्ट्रात २०११ पासून काम करत आहेत. परंतु, त्यांना देण्यात येणारे मानधन तुटपुंजे आहे, तेही वेेळेवर मिळत नाही. कंपनीच्या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते. ग्रामपंचायतकडून ते एकरकमी धनादेश घेतात व त्यातील अर्धा भागही कर्मचाऱ्यांना मिळत नाही. याबाबत शासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. परंतु, त्याचा उपयोग झालेला नाही.
मानधन दर महिन्याला एकाच तारखेला देण्यात यावे, नोकरीची सुरक्षा देण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, १० ते १२ हजार किमान मानधन मिळावे, कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
-----------
फोटो - २३संगणक परिचालक आंदोलन
मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.