शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:19 PM2020-06-01T12:19:47+5:302020-06-01T13:05:33+5:30
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षातील ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तिचा संपर्कातील त्यांचा मुलगा-सून व दोन नातवंडे अशा चार जणांना रात्री उशीरा तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले आहे, अशी माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी शुक्रवारी (दि.१ जून) ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षातील ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तिचा संपर्कातील त्यांचा मुलगा-सून व दोन नातवंडे अशा चार जणांना रात्री उशीरा तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले आहे, अशी माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी शुक्रवारी (दि.१ जून) ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोनाबाधित असलेली महिला व त्यांच्या कुटुंबाचे मूळ गाव शेवगाव तालुक्यातील मळेगाव आहे. मात्र मुंबई येथून येताना त्यांनी शहरटाकळी येथील पास घेतला आहे. त्या पासवर वरिष्ठ पोलीस अधिका-याचा शिक्का व सही असल्याची माहिती शहरटाकळीचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल आव्हाड व तलाठी संदीप आठरे यांनी दिली.
३० मे रोजी सदर कुटुंब मुंबईहुन शहरटाकळी येथे आल्यानंतर त्यांना अंत्रे येथील शहरटाकळी हायस्कूलमधील विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्याच दिवशी महिलेच्या पतीला छातीत त्रास जाणवू लागण्यानंतर दोघांना नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यांचे अहवाल आल्यानंतर महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अधिका-यांनी रविवारी रात्री २ वाजता महिलेसोबत असलेला तिचा मुलगा, सून व दोन नातवंडे यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवले.
शहरटाकळी गाव शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश डोके, नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली.