कोविड आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:17 AM2020-09-15T11:17:43+5:302020-09-15T11:20:45+5:30

श्रीगोंदा - कोविड 19 संसर्ग रोखण्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व रविंद्र बोरूडे (रा. लोणीव्यंकनाथ ) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed a case against Balasaheb Nahata | कोविड आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

कोविड आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

श्रीगोंदा - कोविड 19 संसर्ग रोखण्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची पायमल्ली बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व रविंद्र बोरूडे (रा. लोणीव्यंकनाथ ) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समजलेली अधिक माहिती अशी की बाळासाहेब नाहाटा यांनी दि 15 सप्टेंबर रोजी लोणीव्यंकनाथ सहकारी सोसायटीत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचे हस्ते सभासदांना कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले होते. 

या मेळाव्याचा ते रविंद्र बोरुडे यांची तीन चाकी रिक्षा मधून भोंगा लावून प्रचार करीत होते ही घटना दि 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता लोणीव्यंकनाथ ग्रामपंचायती समोर घडली त्यानुसार पोलिस काॅस्टेबल संतोष कोपनर यांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हेड काॅस्टेबल व्ही एम बढे करीत आहेत.

 सहकारी संस्थांच्या  दैनंदिन कामकाजात कधी हस्तक्षेप केला नाही पण जिल्हाधिकारी यांचे कोविड 19 पाश्र्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असताना गाडीला भोंगा लावून प्रचार प्रसार करून लोकांना एकत्र जमा केले जात होते म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. अशा पध्दतीने कोणी रस्त्यावर येऊन नियमाचे उल्लंघन केले तर पोलिस कायदेशीर कारवाई करतील 

-दौलतराव जाधव पोलिस निरीक्षक 

 

Web Title: Filed a case against Balasaheb Nahata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.