बियाणे कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:44 AM2020-07-04T11:44:24+5:302020-07-04T11:44:33+5:30

कोपरगाव : कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या बियाणे कंपनीने कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव, संवत्सर,ओगदी व इतर गावातील शेतकºयांना के. एस. एल. ४४१ या सोयाबीनच्या निकृष्ट वाणाची जून महिन्यात विक्री केली होती.

Filed a case against the manager of the seed company | बियाणे कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

बियाणे कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

कोपरगाव : कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या बियाणे कंपनीने कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव, संवत्सर,ओगदी व इतर गावातील शेतकºयांना के. एस. एल. ४४१ या सोयाबीनच्या निकृष्ट वाणाची जून महिन्यात विक्री केली होती.

शेतकºयांनी या बियाणाची पेरणी केल्यानतर १० ते २० टक्केच उगवण झाल्याने शेतकºयांची फसवणूक झाली हे लक्षात आले होते. त्यानंतर या प्रकरणी कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी अशोक यादवराव आढाव यांनी कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अंभोरे यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.३) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहे.

Web Title: Filed a case against the manager of the seed company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.