अकोलेतील सौदर्यांच्या प्रेमात पडताहेत चित्रपट निर्माते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:32 PM2020-02-16T15:32:17+5:302020-02-16T15:33:22+5:30

मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ लक्षात घेऊन ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपटांच्या निर्मितीकडे सध्या कल वाढला आहे. ‘राणू’चं नुकतच चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित झाला. यापूर्वी गणवेश, योध्दा या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण अकोले शहर व तालुक्याच्या मातीत झाले.

Filmmakers are falling in love with the deals in Akole | अकोलेतील सौदर्यांच्या प्रेमात पडताहेत चित्रपट निर्माते

अकोलेतील सौदर्यांच्या प्रेमात पडताहेत चित्रपट निर्माते

हेमंत आवारी । 
अकोले : मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ लक्षात घेऊन ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपटांच्या निर्मितीकडे सध्या कल वाढला आहे. ‘राणू’चं नुकतच चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित झाला. यापूर्वी गणवेश, योध्दा या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण अकोले शहर व तालुक्याच्या मातीत झाले. त्यामुळे स्थानिक बाल व ज्येष्ठ कलाकारांना चित्रपटातून चकमण्याची संधीही मिळाली. ‘राणू’तही तालुक्यातील दहा-बारा कलावंत दिसताहेत.
निसर्गाचं लेणे लाभलेल्या या आदिवासी बहुल तालुक्यात चित्रपटाच्या शुटींगसाठी भरपूर ठिकाणे आहेत. टिपीकल खेडी, भंडारदरा जलाशय परिसर, तालुक्यात असलेले जवळपास २६ गड किल्ले, अगस्तीसह सिध्देश्वरसारखी पौराणिक मंदिरे, अगस्ती-मॉडर्न हायस्कूल, अभिनव स्कूल, बसस्थानक परिसर, अगस्तीची महाशिवरात्र यात्रा, गावोगावाच्या जत्रा, तांभोळ शाळा, हिरवाकंच प्रवरानदी काठ, ऊस बागायती शेती, आदिवासी भागातील तिन्ही ऋतूत वेगळेपण दडलेलं संघर्षमय जीवन अशा अनेक गोष्टी चित्रपट चित्रीकरणासाठी याभागात सहज उपलब्ध आहेत. 
या भागातील लोक हौशी आहेत. चित्रपट निर्मात्यास आढेवेढे न घेता आपल्या मालकीच्या जागा उपलब्ध करुन देतात. शाळा कॉलेज व देवस्थानसारख्या संस्थाही सहकार्य करतात. कमी मोबदल्यात स्थानिक कलाकार मिळतात. काही हौशी कलाकार संधी म्हणून विनामोबदला चित्रपटात काम करतात.
 या सर्व बाजूचा विचार करुन मराठी चित्रपट निर्मात्यांनी अकोलेकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे. याच बरोबर धुमाळवाडी व नवलेवाडी येथील तरुण चित्रपट निर्माते क्षेत्रात असल्याने शुटींगसाठी अकोलेभागाला प्राधान्य दिले जात  आहे. योध्दा व सरगम चित्रपटाचा निर्माता मच्छिंद्र धुमाळ, ‘गैर’  चित्रपटाचा निर्माता संतोष नवले अकोलेच्या मातीतील असून रवींद्र नवले, प्रदीप नवले, नाना रसाळ अशी काही मंडळी चित्रपटांतून पडद्यावर नेहमी दिसतात. 
अकोलेतील कलाकार पडद्यावर 
‘राणू’ चित्रपटाचे बहुतांशी शुटींग अकोले परिसरात  झाले आहे. संदीप रसाळ, राजू अत्तार, विलास गोसावी, सुभाष खरबस, डॉ.उल्हास कुलकर्णी, इंद्रभान कोल्हाळ, सादिक शेख, असमा शेख, सतिश मालवणकर, अक्षय भिंगारदिवे,  अथर्व रसाळ, रामदास  धुमाळ या हौशी कलाकारांना ‘राणू’ चित्रपटात संधी मिळाली आहे. 

Web Title: Filmmakers are falling in love with the deals in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.