कोपरगावच्या मातीचा सुगंध जगभर पसरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:09+5:302021-07-31T04:22:09+5:30

कोपरगाव : कवितेच्या माध्यमातून कोपरगावच्या मातीचा सुगंध जगभर पसरावा, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ. ...

The fragrance of Kopargaon soil should spread all over the world | कोपरगावच्या मातीचा सुगंध जगभर पसरावा

कोपरगावच्या मातीचा सुगंध जगभर पसरावा

कोपरगाव : कवितेच्या माध्यमातून कोपरगावच्या मातीचा सुगंध जगभर पसरावा, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद भोसले यांनी म्हटले आहे.

कोपरगाव येथील शब्दगंध साहित्यिक परिषद शाखेच्यावतीने गुरुवारी (दि. २९) ऑनलाइन काव्य संमेलन पार पडले. त्याच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्ष विजय वहाडणे, कवी सुभाष सोनवणे, ऐश्वर्या सातभाई, प्रा. डॉ. कैलास कांबळे, सुधीर कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भोसले म्हणाले, आपली पाळेमुळे कोपरगावच्या मातीत रुजली, वाढली त्यामुळे कोपरगावचे आकर्षण कायम आहे, या काव्य संमेलनात सर्व कविता प्रासंगिक आशावादी आणि प्रेरणादायी आहेत. कवी सुभाष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करून कविता सादर केली. तर सुनील गोसावी यांनी शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कैलास साळगट यांनी तर स्वागत व परिचय कार्याध्यक्ष डॉ.संजय दवंगे यांनी करून दिला. या काव्य संमेलनात वंदना चिकटे, गणेश पवार, प्रमोद घोरपडे, नारायण गडाख, साक्षी थोरात, योगेश जाधव, सुनील केकान, सुनीता आत्रे, सागर पठारे, मोहिनी लोळगे, नंद किशोर, प्रतिभा खैरे, प्रमोद येवले, कार्तिक झेंडे यांनी आपल्या रचना सादर केल्या. या कार्यक्रमास कवयित्री शर्मिला गोसावी, हेमचंद्र भवर, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र उदारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे सूत्रसंचालन मधुमिता निळेकर यांनी केले, तर उपाध्यक्ष सुधीर कोयटे यांनी आभार मानले.

Web Title: The fragrance of Kopargaon soil should spread all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.