मोफत रोपवाटिका प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:23+5:302021-02-14T04:19:23+5:30
सदर प्रशिक्षणासाठी २० फेब्रुवारी, २०२१ पर्यंत नावनोदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामध्ये फळ रोपे, भाजीपाला रोपे तयार करणे, फळे ...
सदर प्रशिक्षणासाठी २० फेब्रुवारी, २०२१ पर्यंत नावनोदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामध्ये फळ रोपे, भाजीपाला रोपे तयार करणे, फळे भाजीपाला अभिवृद्धी, फळबाग आखणी आणि उभारणी, बागेचा आराखडा, नर्सरी उद्योगांची उभारणी आणि व व्यवस्थापन, पिकांचे पीक संरक्षण निगा आणि काळजी, नर्सरीसाठी परवाना प्रक्रिया, नर्सरीमधील सुरक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रक्षेत्र भेटी आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षण विनामूल्य आहे. शैक्षणिक पात्रता किमान पाचवी आहे. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, २ फोटो आवश्यक आहेत. प्राधान्याने २० प्रशिक्षणार्थींना प्रवेश द्यावायाचा आहे. सदरचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना भारत सरकारच्या कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्रालयाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, तरी इच्छुक गरजूंनी केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने केले आहे.