डेअरी फार्मिंगविषयी व्यावसायिक विनामूल्य प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:20+5:302021-02-14T04:19:20+5:30
सदरची प्रशिक्षणासाठी २० फेब्रुवारी २०१२ पर्यंत नावनोंदणी करावी. या प्रशिक्षणामध्ये गायीचे पैदाशास्त्र कृत्रिम रेतन तंत्र, आहार-आरोग्य काळजी आणि निगा ...
सदरची प्रशिक्षणासाठी २० फेब्रुवारी २०१२ पर्यंत नावनोंदणी करावी.
या प्रशिक्षणामध्ये गायीचे पैदाशास्त्र कृत्रिम रेतन तंत्र, आहार-आरोग्य काळजी आणि निगा या विषयांचा समावेश आहे. याचबरोबर मुक्त संचार पद्धत, मुरघास, अझोला, चारा पिके यातील तर तंत्रज्ञानावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रक्षेत्र भेटी आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षण विनामूल्य आहे. शैक्षणिक पात्रता किमान सातवी पास आहे. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, दोन फोटो आवश्यक आहे. प्राधान्याने २० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार आहे.
सदर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना भारत सरकारच्या कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्रालयाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी इच्छुक आणि गरजूंनी केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन केंद्राद्वारे केले आहे.