शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची अंत्ययात्रा

By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:41+5:302020-12-08T04:18:41+5:30

अहमदनगर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील दिल्लीगेट ...

Funeral of anti-farmer black law | शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची अंत्ययात्रा

शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची अंत्ययात्रा

अहमदनगर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील दिल्लीगेट ते चौपाटी कारंजापर्यंत शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.

जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, अंकुश शेळके, संदीप पुंड, देवेंद्र कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिल्पा दुसुंगे, अमन तिवारी, गणेश भोसले, सुजय गांधी, योगेश घाडगे, आशिष गुंदेचा, शंकर जगताप, अनिश पाटोळे, आकाश साळवे, विठ्ठल गजभिये आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दिल्ली येथे मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास अहमदनगर जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी करीत मंगळवारच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

---

फोटो- ०७ युवक कॉंग्रेस

अहमदनगर जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीने नगर शहरात शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, अंकुश शेळके आदी सहभागी झाले होते.

Web Title: Funeral of anti-farmer black law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.