विकास बाळू हनवत (२४, कात्रज ता. राहुरी), करण नवनाथ शेलार (वय १९, रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा) या दोघांसह एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. याई तिघांसह त्यांच्या दोन साथीदारांनी २३ एप्रिल रोजी मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावर दोघांना अडवून त्यांची लूटमार केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना राहुरी, नेवासा परिसरातून अटक केली. आरोपींनी या आधी नेवासा तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्द यासह विविध ठिकाणी प्रवाशांना अडवून लूटमार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. आरोपींकडून पोलिसांनी चार मोटारसायकली, २ मोबाइल, रोख रक्कम असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील आरोपी विकास हनवत याच्याविरोधात शनिशिंगणापूर, सोनई, एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार नाणेकर, हेडकॉन्स्टेबल इंगळे, संदीप घोडके, मनोज गोसावी, सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
घाटात प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:15 AM