कांद्याला दोन हजार रुपये भाव द्या
By Admin | Published: March 16, 2016 08:29 AM2016-03-16T08:29:01+5:302016-03-16T08:29:11+5:30
अहमदनगर : कांद्याचे भाव गडगडले आहेत़ त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, कांद्याला किमान दोन हजार रुपये भाव देण्यात यावा,
अशोक पाटील --इस्लामपूर मतदारसंघातील विद्यमान आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व आजही अबाधित आहे. येथून पुढेही ते अबाधित राहणार, राहील यात शंका नाही. त्यांच्याविरोधात असणारे सर्वच विरोधी नेते सत्तेच्या मृगजळामागे धावतात. पण त्यांना त्यात यश मिळत नाही. यामागे विरोधकांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद आणि एकाच कुटुंबात वेगवेगळी राजकीय मते असल्याची चर्चा दबक्या आवाजात नेहमीच सुरु असते.
वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, सांगली जि. म. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील या घराण्यांकडे सत्ताकेंद्रे आहेत. राष्ट्रवादीतील सर्वच नेते आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांचा शब्द प्रमाण मानतात. परंतु स्थानिक पातळीवरील राजकारणात अंतर्गत मतभेद आहेत.
या भक्कम असलेल्या राष्ट्रवादीविरोधात स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील, हुतात्मा संकुलनाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, अभिजित पाटील, वैभव पवार हे नेते सक्रिय आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्यावेळी त्यांच्याकडून वेगवेगळ्या भूमिका बजावल्या जातात. त्यांच्यामध्ये अंतर्गत राजकीय अडथळे तसेच विरोधकांचे संघटन कोणी करायचे, या वादामुळे त्यांची ताकद नेहमीच तोकडी पडत आली आहे.
आमदार जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार अद्यापही राजकारणात नाहीत. परंतु त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील मात्र सावधपणे राजकारणाबरोबर उद्योग समूहाचा आढावा घेताना दिसत आहेत. अलीकडील सहा महिन्यात त्यांनी उद्योग समूहातील बैठकांनाही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
नानासाहेब महाडिक यांच्यापुढे सत्तास्थाने आहेत. परंतु त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या महाडिक कोणत्या पक्षात आहेत हे गुलदस्त्यात आहे. हुतात्मा संकुलनाची सर्व जबाबदारी वैभव नायकवडी यांनी आपल्या हाती घेतली आहे, तर त्यांचेच पुतणे सरपंच गौरव नायकवडी हे राजकारणात भरारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांनाही अंतर्गत अडथळे असल्याची चर्चा आहे.
बोरगाव जि. प. मतदारसंघातील माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात आमदार पदाची निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसमधीलच काही नेते त्यांना विरोध करत आहेत. त्यामुळे अद्यापही ते जि. प. मतदारसंघाच्या बाहेर पडून कोणतीही निवडणूक जिंकू शकलेले नाहीत.
इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले की, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, भाजयुमोचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार हे एकत्र निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करतात. परंतु ऐनवेळी त्यांच्यातच कुरघोड्या होत असल्याने याचा राष्ट्रवादीला फायदा होतो.
शिराळा तालुक्यातही आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी मानसिंगराव नाईक यांचा पराभव करुन या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला आहे.
मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे वेगवेगळे लढल्यानेच शिवाजीराव नाईक यांना विजयश्री मिळाली. तरीही मतदार संघात भाजपची म्हणावी अशी ताकद दिसत नाही. आता पुन्हा मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख एकत्रित येऊन शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात मोट बांधत आहेत. आता आगामी राजकीय उलथापालथीकडे लक्ष लागले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतभिन्नता
इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले की, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, भारतीय युवा मोर्चाचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार हे एकत्र निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करतात. परंतु ऐनवेळी त्यांच्यातच कुरघोड्या होत असल्याने याचा राष्ट्रवादीला फायदा होतो. जयंत पाटील यांच्याविरोधात नेहमी ऐनवेळी एकमत होताना दिसत नाही.