गोदावरी नदीत १०० क्युसेकने पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:23+5:302020-12-23T04:17:23+5:30
यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदी सातत्याने वाहत राहिली. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील पिके चांगली राहिली. मागील दोन महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतली ...
यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदी सातत्याने वाहत राहिली. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील पिके चांगली राहिली. मागील दोन महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतली होती; परंतु नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीवरील सर्वच बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेतले होते. त्यानुसार यंदा पाण्याची शाश्वती असल्याने नदीकाठी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड, तसेच गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा बेसुमार उपसा होत असल्याने बंधाऱ्यातील पाण्याची दिवसागणिक पाणी पातळी खाली जात होती. काही बंधाऱ्यांत तर ५० टक्क्यांपर्यंत पाणी कमी झाले होते. त्यामुळे यंदा जानेवारीच्या सुरुवातीलाच बंधारे कोरडेठाक होणार असा अंदाज होता; परंतु गोदावरी नदीला अकस्मात सोडलेल्या पाण्यामुळे बंधारे पुन्हा भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आनंद झाला आहे. नदीत सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी (दि.२२) सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील बंधाऱ्याच्या पुढे निघाले होते.