गुरुकुल महिला आघाडीने साजरी केली मानवतावादी दिवाळी
By चंद्रकांत शेळके | Published: November 7, 2023 07:42 PM2023-11-07T19:42:16+5:302023-11-07T19:42:25+5:30
या महिलांना आर्थिक मदतीपेक्षा समाजाचे असे मानसिक बळ वाढवणारे प्रेम अपेक्षित आहे.
अहमदनगर : गुरुकुल महिला आघाडीने देहरे येथील मनगाव प्रकल्पाला दिवाळी फराळ व नित्योपयोगी वस्तू देऊन मानवतावादी दिवाळी साजरी केली.
मनगाव प्रकल्पाच्या संस्थापक डॉ. सुचेता धामणे म्हणाल्या, खरा निरोगी समाज शिक्षकच घडवू शकतो. महिलांच्या बाबतीत समाज कितीही उदारमतवादी बोलत असला तरी वास्तव वेगळे आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या स्रियांना कुटुंबाचे प्रेम मिळत नाही. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य अजून बिघडते. त्या रस्त्यावर येतात. अशा स्रिया समाजाच्या तावडीत सापडल्या तर त्या अत्याचाराला बळी पडतात. त्यांना आधार देण्याचे काम या प्रकल्पात केले जाते. आज गुरुकुलच्या शिक्षक व शिक्षिकांनी दिवाळसणाला या अभागी महिलांमध्ये येऊन दिवाळी साजरी केली. या महिलांना आर्थिक मदतीपेक्षा समाजाचे असे मानसिक बळ वाढवणारे प्रेम अपेक्षित आहे.
डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले, शिक्षकांनी मुलांना शाळकरी वयात संस्काराचे धडे द्यावेत. समाजमाध्यमांमुळे मुलांची ढासळत चाललेली मानसिकता फक्त शिक्षकच सावरू शकतात. गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर-इंगळे, अनुराधा फुंदे, उषा शिंदे, सुनीता काटकर, स्वाती गोरे, अंजली महामेर, मंगला गोपाळे, कमल आंबेकर, उज्ज्वला वासाल, मंगल अष्टेकर, अरुणा लिपाणे, तारा काटकर, नीलिमा थोरात, छाया देठे, स्पंदन इंगळे, समृद्धी नामन, डॉ. संजय कळमकर, किशोर हारदे, मच्छिंद्र दळवी, संजय गोर्डे, सुदर्शन शिंदे, अशोक आगळे, बाळासाहेब कल्हापुरे, भास्कर नरसाळे, उद्धव इंगळे, संजय रेपाळे, दादा फुंदे, संजय काळे, भाऊ नगरे, प्रमोद झावरे, हिंमत चेमटे, भास्कर लांडे, युवराज हिलाळ, संतोष चौधरी, अनिल कल्हापुरे, बाबासाहेब ढोले, प्रकाश कार्ले, संतोष शिंदे, मधुकर मैड आदी उपस्थित होते.
दरवर्षी येऊ मनगावला...
मनगाव प्रकल्पातील महिलांच्या वेदना पाहून महिलांच्या आयुष्याची दुसरी बाजू समजली. ती पाहून आम्ही निशब्द झालो आहोत. अशा स्रियांना मानसिक आधार देऊन पुन्हा उभे करण्याचे काम डॉ. धामणे दाम्पत्य करीत आहे. आम्ही दरवर्षी मनगावला येऊन अशीच मानवतावादी दिवाळी साजरी करू, असे गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर-इंगळे म्हणाल्या.