शिर्डीतील गुरूपौर्णिमा उत्सव रद्द; साईदर्शनालाही बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:14 PM2020-07-03T14:14:42+5:302020-07-03T14:15:47+5:30
शिर्डी येथील रविवारी (५ जुलै) साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तसे पत्रही जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शुक्रवारी (दि.३ जुलै) पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना दिले आहे.
अहमदनगर : शिर्डी येथील रविवारी (५ जुलै) साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तसे पत्रही जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शुक्रवारी (दि.३ जुलै) पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना दिले आहे.
शिर्डी येथे दरवर्षी गुरूपौर्णिमा उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होत असतो. यासाठी राज्यभरातून पालख्या साईदर्शनासाठी शिर्डीत येत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचा रविवारचा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. रविवारी साई मंदिर बंदच राहणार आहे.
दरम्यान, या दिवशी साईमंदिर बंद राहणार आहे. तसेच गुरूपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोणालाही साईदर्शनासाठी दर्शन पास देऊ नयेत, असेही जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.