घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शिवशंभू कोविड सेंटरमधून सर्व १९१ पेशंट बरे होऊन घरी गेले. हे दिव्य पार पाडण्यासाठी आपला अमूल्य वेळ देणारे डॉ. चंद्रशेखर कळमकर, डॉ. विनायक शिंदे, मोफत अन्नदानाची करणाऱ्या संगीता खामकर, आरोग्य सेवकाची भूमिका बजावणारे अण्णा चौधरी यांचा सोमवारी (दि.३१) ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव करण्यात आला. कोरोनाच्या महामारीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घारगाव व पंचक्रोशीतील रुग्णांना सेवा देण्याचे काम आमच्या आरोग्यदूतांनी केले आहे. प्रत्येक गावाने असा आदर्श जपल्यास लवकरच कोरोनाची जीवघेणी साथ आटोक्यात येईल, असे मत माजी अध्यक्ष रमेश खोमणे यांनी व्यक्त केले. त्याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी माणिक होनकर्पे, तलाठी स्वप्नील होळकर, कृषी सहाय्यक चंद्रशेखर कलगुंडे, रमेश खोमणे, ऋषीकेश भारती, बाळासाहेब पानसरे, अमोल खोमणे आदी उपस्थित होते.
---
३१ घारगाव
घारगाव येथे ग्रामपंचायतीकडून आरोग्यदूतांचा सन्मान करण्यात आला.