काष्टीच्या ऐतिहासिक वेशीचे युवकांनी केले सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:25+5:302021-02-14T04:19:25+5:30
किल्ले, राजवाड्यासारखा निळ्या करड्या रंगात पुन्हा ही ऐतिहासिक खूणगाठ दिमाखात इतिहासाची साक्ष देत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर (जि. ...
किल्ले, राजवाड्यासारखा निळ्या करड्या रंगात पुन्हा ही ऐतिहासिक खूणगाठ दिमाखात इतिहासाची साक्ष देत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथे कैद करण्यात आले. त्यानंतर पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील बहादूर गडावर साखळदंडात बांधून जेरबंद करून त्यांचे डोळे काढण्यात आले. डोळे काढल्यानंतर तुळापूरला नेताना घोडनदी तीरावर असलेल्या या काष्टीच्या वेशीतून त्यांना पुढे तुळापूरला मार्गस्थ करण्यात आले. त्यामुळे ऐतिहासिक वेस म्हणून उल्लेख शिवाजी सावंत यांनी त्यांच्या कादंबरीत केल्याचा आढळतो.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली काष्टीची ही वेस अनेक पिढ्यांना इतिहास साक्ष देत आहे. या वेशीचे संरक्षण करण्याचे काम, परिश्रम काष्टीतील युवक अभिजीत पाचपुते, गणेश जगताप, अशोक पांडुळे, अभिजित पाचपुते, गणेश देशमाने, सुनील वाळके, रवी जाधव, गणेश गडदे, हरिदास खामकर करीत आहेत.