मंगळवारपासून आजारी व्यक्तींच्या तपासणीसाठी घरोघरी सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 04:16 PM2020-09-14T16:16:06+5:302020-09-14T16:16:29+5:30
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात मंगळवार (दि. १५)पासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत कोरोनादुतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी. आजारी तसेच लक्षणे असणाºया रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. पहिल्या टप्प्यातील ही मोहिम २५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी आॅनलाईन आढावा बैठकीत दिली.

जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. १५ ) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासनाशी संवाद साधला आणि मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि छावणी परिषद क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन सर्वेक्षण करण्यात येईल. यामध्ये सहभागी कोरोनादूत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती घेणार आहेत. ही मोहीम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असेल तर दुसºया फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेमुळे प्रशासनाच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.
---
असे असेल पथक
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी मोहिमेची अंमलबजावणी आणि तयारीबाबत माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) असे तिघांचे पथक असेल. एक पथक १ दिवसात ५० घरांना भेटी देईल. पहिली फेरी १५ दिवस असे गृहीत धरुन संपूर्ण लोकसंख्येसाठी एकूण पथकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे.
---