कामगारांचा पगार देता येत नसेल तर राजीनामा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:34+5:302021-05-05T04:35:34+5:30

शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर, काँग्रेसचे सचिन चौगुले, संजय शिंदे, विजय जगताप, सचिन कोते, उमेश शेजवळ, ...

If you can't pay the workers, resign | कामगारांचा पगार देता येत नसेल तर राजीनामा द्या

कामगारांचा पगार देता येत नसेल तर राजीनामा द्या

शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर, काँग्रेसचे सचिन चौगुले, संजय शिंदे, विजय जगताप, सचिन कोते, उमेश शेजवळ, सुनील गोंदकर, दत्तू त्रिभुवन, अमृत गायके, अमोल गायके, सुरेश आरणे आदींच्या शिष्टमंडळाने आज नगरपंचायत कार्यालयात येऊन या कामगारांच्या रखडलेल्या पगारासंदर्भात नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना विचारणा केली. सत्ताधारी गटाच्या बाजूने भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक सुजित गोंदकर, अशोक गायके उपस्थित होते.

थकीत पगार तत्काळ द्यावे, त्यांना एक महिन्याचा किराणा द्यावा, अंत्यविधीचे काम करणाऱ्या कामगारांचा कोविड विमा काढा व पगार दुप्पट करा, अशी मागणी कमलाकर कोते यांनी केली. नगराध्यक्ष गोंदकर म्हणाले, बी. व्ही. जी. कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. एक महिन्याचा पगार नगरपंचायत आज करणार असून, उर्वरित दोन महिन्यांचा पगार कपंनी करणार आहे.

यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सत्ताधाऱ्यांनी राजीनामे देऊन प्रशासक नेमावा, आम्ही एका दिवसात पगार करू, असे आव्हान सत्ताधारी गटाला दिले.

नगरपंचायत कोट्यवधी रुपयांचे नवीन कामांचे भूमिपूजन करते, कायम कर्मचाऱ्यांचे वेळच्या वेळी पगार करते, स्वच्छता कामगारांच्या जीवावर करोडो रुपयांची बक्षिसे मिळवते, मग या कामगारांचे पगार का रखडवते, असा सवाल काँग्रेसचे सचिन चौघुले यांनी केला.

थकीत पगार तत्काळ द्यावे, त्यांना एक महिन्याचा किराणा द्यावा, अंत्यविधीचे काम करणाऱ्या कामगारांचा कोविड विमा काढा व पगार दुप्पट करा, अशी मागणी कमलाकर कोते यांनी केली. नगराध्यक्ष गोंदकर म्हणाले, बी. व्ही. जी. कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. एक महिन्याचा पगार नगरपंचायत आज करणार असून, उर्वरित दोन महिन्यांचा पगार कपंनी करणार आहे.

यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नगरपंचायतीच्या अन्य फंडातील निधीतून पगार करावे, अशी मागणी आघाडी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर बोलतांना भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी पैसे असले तरी ते इतर कामांवर खर्च करण्यास शासनाची मान्यता लागते. महाविकास आघाडीचे सरकार आहे. अन्य फंडातील रक्कम पगारावर खर्च करण्यास मुख्यमंत्र्यांकडून मान्यता आणा, आम्ही कामगारांचे लगेच पगार करू, असे सांगितले. यावर शिवसेनेचे कमलाकर कोते यांनी प्रत्येक वेळी आमचे सरकार असल्याचे सांगून परवानगी आणण्यास सांगितले जाते. सत्ताधाऱ्यांनी राजीनामे देऊन प्रशासक नेमावा, आम्ही एका दिवसात पगार करू, असे आव्हान सत्ताधारी गटाला दिले.

नगरपंचायत कोट्यवधी रुपयांचे नवीन कामांचे भूमिपूजन करते. कायम कर्मचाऱ्यांचे वेळच्या वेळी पगार करते, स्वच्छता कामगारांच्या जीवावर करोडो रुपयांची बक्षिसे मिळवते. मग, या कामगारांचे पगार का रखडवते, असा सवाल काँग्रेसचे सचिन चौघुले यांनी केला.

Web Title: If you can't pay the workers, resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.