कोतुळात याल तर ; नाकात काडी आणि कोरोनाची गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:32+5:302021-05-20T04:21:32+5:30
कोतूळ ग्रामपंचायत, महसूल, पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोतुळात विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. गेल्या ...
कोतूळ ग्रामपंचायत, महसूल, पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोतुळात विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. गेल्या आठ दहा दिवसांत कोतूळ शहर कडेकोट बंद असताना आसपासच्या गावातील लोक, भाजी, बँक, किराणा, दारू, अशा विविध कारणांनी विनाकारण गर्दी करत होते. ही गर्दी थांबविण्यासाठी ग्रामपंचायत, पोलीस, महसूल व आरोग्य विभागाने कोतूळच्या मुख्य चौकात रॅपिड टेस्ट ॲक्शन फोर्स राबवले.
यात ८५ लोकांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली त्यात पाच लोक बाधित निघाले. घोटी, तळे, सातेवाडी परिसरातील हे रुग्ण आहेत. तपासणीनंतर लगेचच ॲम्बुलन्समध्ये टाकून कोविड सेंटरमध्ये नेले जात होते. त्यामुळे बाहरून आलेल्यांनी नको रे बाबा नाकात काडी आणि ॲम्बुलन्स गाडी म्हणत कोतुळातून पळ काढला. दुपारी बारानंतर कोतुळात कुणीही रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते.
कोतूळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय देशमुख, सदस्य हेमंत देशमुख, कामगार तलाठी संतोष जाधव, ग्रामसेवक सुभाष जाधव, सुनील साळवे, आरएसपीचे राजेंद्र देशमुख, कोतूळ आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी ही योजना राबवली.
...............
कोतुळात पुढील चार दिवस खटपट नाका, दत्त मंदिर, बसस्थानक परिसरात टेस्ट होणार आहेत. विशेष म्हणजे मोकाट फिरणारे काही टवाळ ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले आहेत. पोलिसी कारवाई व टेस्ट दोन्ही गोष्टी करण्यात येतील. वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई होईल.
- संतोष जाधव, शासन समन्वयक, कोरोना नियंत्रण समिती.
(फोटो आहे)
190521\20210519_102053.jpg
कोतूळात अचानक रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आली