सीआयडी घेईना निरीक्षकाच्या आवाजाचा नमुना : पाथर्डी प्रकरणाचा तपास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:42 PM2019-02-13T17:42:22+5:302019-02-13T17:42:26+5:30

थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा वर्षभरापासून तपास रखडला आहे़

Inspector's Speech for CID: Patradi investigated the matter | सीआयडी घेईना निरीक्षकाच्या आवाजाचा नमुना : पाथर्डी प्रकरणाचा तपास रखडला

सीआयडी घेईना निरीक्षकाच्या आवाजाचा नमुना : पाथर्डी प्रकरणाचा तपास रखडला

अहमदनगर : थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा वर्षभरापासून तपास रखडला आहे़ या गुन्ह्यात महत्त्वाचाचा पुरावा ठरणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या आवाजाचा नमुना अद्यापपर्यंत सीआयडीने घेतलेला नसल्याचे समोर आले आहे़ तपासाला गती मिळावी यासाठी गृहराज्यमंत्री यांनी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे दिला होता़ प्रत्यक्षात मात्र तपासात काहीच प्रगती नसल्याने हा विधिमंडळाचा अवमान ठरला आहे़
पाथर्डी येथील पत्रकार हरिहर गर्जे व सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले होते़ याबाबत पत्रकार संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन गर्जे यांच्यावर व्यक्तीद्वेषातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे निवेदन दिले होते़ अधीक्षकांनी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला़ त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात ११ जानेवारी रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ यामध्ये किसन आव्हाड व विजय आव्हाड यांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली़
दरम्यान पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांच्यात मोबाईल फोनवरून झालेल्या संभाषणाची एक आॅडिओ क्लिप १४ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली़ या क्लिपमधील संवादातून कशा पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला़ यांचे संभाषण आहे़ ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खोट्या गुन्ह्यात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अडकविले जात असल्याने जिल्हाभरातून सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते़ याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता़
यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गर्जे, आव्हाड यांच्यावरील गुन्हे व व्हायरल क्लिपबाबत सीआयडीकडे तपास देण्याचे तसेच खोटे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते़ गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाले़ गुन्हा वर्ग होऊन खूप दिवस होऊन गेले आहे़ या गुन्ह्याच्या तपासात मात्र काहीच प्रगती होईना़

सीआयडीने अडीच महिने काय केले?
च्पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी त्यांना बोलविण्यात येणार आहे़, अशी प्रतिक्रिया सीआयडीचे उपाधीक्षक के़पी़ यादव यांनी लोकमतच्या गत २८ नोव्हेंबरच्या वृत्तात दिली होती़ दोन महिने उलटून गेल्यानंतर तपासातील प्रगती जाणून घेतली असता ‘चव्हाण यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत’ असे उत्तर यादव यांनी लोकमतला दिले़ त्यामुळे सीआयडीने गत अडीच महिने या प्रकरणाचा नेमका काय तपास केला? असा प्रश्न आता उपस्थित होतो़ सीआयडी तपास करण्यास टाळाटाळ करत आहे, असा अर्थ यातून निघू लागला आहे़

Web Title: Inspector's Speech for CID: Patradi investigated the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.