आंदोलनात राष्ट्रीय तमध सत्याग्रहींचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:23+5:302021-08-23T04:24:23+5:30
..... जुनी पेन्शन योजना लागू करा अहमदनगर: मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के ...
.....
जुनी पेन्शन योजना लागू करा
अहमदनगर: मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धतीबाबतचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा. तसेस खासगी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे स्मरणपत्र शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
....................
वडाच्या झाडांचा वाढदिवस साजरा
अहमदनगर: माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन व वृक्ष बँकेच्या माध्यमातून कोल्हार (ता. पाथर्डी) येथील तीर्थक्षेत्र कोल्हुबाई गडावर लावण्यात आलेल्या पाचशे वडांच्या झाडांचा पहिला वाढदिवस फुलझाडांच्या वृक्षरोपणाने करण्यात आला. यावेळी विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे, निवृत पोलिस अधिकारी सुभाष सोनावणे, माजी सभापती संभाजीराव पालवे, सरपंच शोभा पालवे, शिवाजी पालवे, लक्ष्मण गिते, शंकर डमाळे, विष्णु गिते, आजिनाथ पालवे, सुरेश बडे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, महादेव शिरसाठ, अंकुश भोस, यादवराव पालवे, चंदू नेटके, संतोष पालवे, आजिनाथ पालवे, गोविंद पालवे, शहादेव पालवे, हरी जाधव आदी.
..................
चासमध्ये मतदार जागृती अभियान
अहमदनगर: तालुक्यातील चास गावात अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री. नवनाथ युवा मंडळ, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त कला पथकाच्या माध्यमातून स्वच्छता व मतदार जागृती करण्यात आली. यावेळी चासचे सरपंच राजेंद्र गावखरे, उपसरपंच युवराज कार्ले, निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, अंबादास रासकर, रावसाहेब देवकर, डी.के. काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, सुनील गोंडाळ, उमाकांत सोनवणे, किसन गावखरे, संदीप कार्ले, रघुनाथ कार्ले, राजेंद्र जाधव, अंकुश काळे, संजय जाधव आदी.