ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:21+5:302021-07-17T04:17:21+5:30

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी उपस्थित पोलीस पाटील, ...

It will help in reducing crime through village security system | ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी उपस्थित पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन केले. यावेळी या नवीन यंत्रणा वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

पाटील म्हणाले, गावपातळीवर स्वयंचलित ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यासाठी जिल्हाभर ग्राम सुरक्षा शिबिरे घेण्यात आली. गावात चोरी, दरोड्याची घटना वन्यप्राण्यांचा हल्ला, आग, जळिताची घटना, महापूर इत्यादी आकस्मिक घटनेमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत तातडीने मदत मिळविणे व दुर्घटनेस आळा घालणे शक्‍य होणार आहे. याचा पोलीस प्रशासनाला निश्चित फायदा होणार आहे. याशिवाय ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील निधन वार्ता, ग्रामसभा, गावात येणाऱ्या शासकीय योजना, मेळावे, शिबिरे यांची देखील माहिती तात्काळ गावातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे सोपे होईल. गावातील सर्व मोबाईलधारक ग्रामस्थ सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊ शकतात.

डीवायएसपी संदीप मिटके, तहसीलदार एफ. आर. शेख, पीएसआय नीलेश वाघ, पीएसआय तुषार धाकवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले.

Web Title: It will help in reducing crime through village security system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.