कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याने ७ लाख ५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०.१६ इतका साखर उतारा मिळविला आहे. कारखाना मागील आठवड्यात बंद झाला आहे.
शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याने ७ लाख २ हजार ५२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ५६ हजार ९२५ साखर पोती तयार केली. १०.८४ इतका विक्रमी साखर उतारा मिळविला आहे.
साजन शुगरने १ हजार २०० मेट्रिक टन गाळप क्षमता असताना २ लाख ९८ हजार ३६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ७ हजार ९०० साखर मेट्रिक क्विंटल साखर निर्माण करीत असताना १०.३७ इतका साखर उतारा मिळविला आहे.
तीन लाख मेट्रिक टन गाळप करून साजन शुगरचा बाॅयलर थंडावणार आहे. साजनने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ३०० रुपये प्रतिटन भाव देऊन भावात आघाडी घेतली आहे.
तीन साखर कारखान्यांनी मिळून सुमारे १७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
दौंड, शुगर, अंबालिका, बारामती अॅग्रो, भीमाशंकर, पारनेर या साखर कारखान्यांनी श्रीगोंद्यातील ६ लाख मेट्रिक टन ऊस उचलला आहे.
..............
कुकडी साखर कारखान्याने अडचणीवर मात करून विक्रमी गाळप केले आहे. उसाला अंतिम भाव जास्तीत जास्त कसा देता येईल यावर विचार करणार आहे.
- राहुल जगताप, अध्यक्ष कुकडी साखर कारखाना
............
नागवडे साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले. विक्रमी साखर उतारा मिळाला आहे. यामुळे अंतिम जादा देण्यास मदत होईल सभासदांनी निश्चित राहावे.
- राजेंद्र नागवडे, अध्यक्ष नागवडे, साखर कारखाना
........
कमी वयात साखर कारखान्याची धुरा खांद्यावर पडली. त्यामध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. जिद्दीने खिंड लढविली. उसाला पहिला हप्ता २३०० रुपयांनी दिला. इतरांपेक्षा भावात पुढेच राहणार आहे.
- साजन पाचपुते,
अध्यक्ष, साजन शुगर देवदैठण