श्रीरामपूर : शहरातील मोरगेवस्ती परिसरात पतंग उडविताना चिनी नायलॉन दोर अडकून दुचाकीस्वाराची हाताची तीन बोटे कापली गेली. अन्य एका व्यक्तीचा गळा कापला गेला. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोरगेवस्ती परिसरात गुरुवारी लहा मुले रस्त्यावर पतंग उडवित होती. यावेळी व्यावसायिक नाना नागले हे दुचाकीवरुन घराकडे जात असताना पतंगाचा दोर मोटारसायकलला अडकला. त्यामुळे त्यांच्या हाताची बोटे कापली गेली. अन्य एका घटनेत बाळू मोरगे यांच्या गळ्यास पतंगाचा दोर गुंतला व गळा कापला गेला. पतंग उडविण्यासाठी चिनी नायलॉन दोर वापरू नये असे अनेक वेळा जाहीर झाले. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र अशा प्रकारचे दोर विकणाºयांवर कायदेशीर कारवाही होत नाही, असा संताप व्यक्त केला जात आहे. मुलांनी रस्त्यावर पतंग न उडवता मोकळ्या मैदानात खेळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पतंगाचा दोराने एकाचा गळा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 3:54 PM