अकोलेतील कुमशेत समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:02+5:302021-06-25T04:16:02+5:30

राजूर : कोरोनाला आपल्या गावापासून कोसो दूर ठेवत ४५ वर्षांपुढील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण करून घेतलेल्या आणि जलक्रांती घडवत ...

Kumshet in Akole in the pit of problems | अकोलेतील कुमशेत समस्यांच्या गर्तेत

अकोलेतील कुमशेत समस्यांच्या गर्तेत

राजूर : कोरोनाला आपल्या गावापासून कोसो दूर ठेवत ४५ वर्षांपुढील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण करून घेतलेल्या आणि जलक्रांती घडवत जलयुक्त पुरस्कारप्राप्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कुमशेत हे गाव सध्या रस्ते, आरोग्य, वीज, रोजगार, बंद झालेली एसटी बस, वैयक्तिक वनहक्क दावे रखडले आहेत.

अहमदनगर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या नैऋत्य सरहद्दीवर सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले अतिदुर्गम भागातील कुमशेत. या गावी कृषी विभागाने नऊ आणि वनविभागाने दोन असे एकूण अकरा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या या बंधाऱ्यांनी या खेड्यात जलक्रांती केली, असे असतानाही अनेक मूलभूत सुविधांच्या विळख्यात हे खेडेगाव सापडलेले दिसून येत आहे.

आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असणारे धारेराव देवस्थान याच ठिकाणी. या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलास मागील दोन-तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली, पुलाचे कामही सुरू झाले; मात्र ठेकेदाराने अर्धवट काम करून धूम ठोकली, ते आजतागायत तसेच आहे. अनेक भाविकांना आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात ये-जा करताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

या गावी जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, त्यावरील उघडी पडलेली खडी या सर्व बाबींचा या गावी व वाड्यावस्त्यांना जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे गावी येणारी कुमशेत आणि दुसरी आंबित बस सध्या बंदच आहे. रस्त्यावरील जायनावाडी ते कुमशेत हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला; मात्र त्याचे काम सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त सापडला नाही.

कोरोना सुरू झाल्यापासून येथील अनेक तरुणांच्या आणि इतरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे रोजगाराच्या समस्या येथे भेडसावत आहेत. पावसाळ्यात येथील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो आणि नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.

गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिरपुंजे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे तर त्यापुढे मोठ्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळपास उपकेंद्र नसल्याने अनेक रुग्ण दवाखान्यात जाण्याचे टाळताना दिसून येतात. यावर उपाय म्हणून येथे एक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र सुरू करण्याची या गावाची मागणी तशी जुनीच आहे. तर १९९८ मध्ये झालेली नळपाणी पुरवठा योजना मोडकळीस आल्यामुळे अनेक वेळा महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे.

..............

बंधाऱ्यामुळे जलक्रांती

गाव शिवारात कृषी आणि वनविभागाने बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे जलक्रांती झाली. भर उन्हाळ्यात या बंधाऱ्यांत पाणी असते. मात्र, नळपाणी पुरवठा योजना कायम सतावत असल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा कायम आहे. जलजीवन मिशनचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केला; मात्र तो अद्याप लालफितीत अडकला आहे. वनहक्क दावे, रस्ता आणि पूल दुरुस्तीसाठी हेलपाटे मारूनही मार्ग निघत नाही.

..........

सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाला दूर ठेवले आहे. त्यातच आदिवासी भागात लसीकरणाबाबत समज-गैरसमज निर्माण होत असतानाही ४५वर्षांपुढील नागरिकांचे प्रबोधन करत सत्तर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण केले. आता तरुणाईचे लसीकरण करून घेणार आहे. शासनाने लक्ष घालून आमच्या समस्या सोडवाव्यात, अशी आमची इच्छा आहे.

- सयाजी असवले, सरपंच, कुमशेत.

फोेटो आहे...

Web Title: Kumshet in Akole in the pit of problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.