तालुक्यातील चार स्वयंसहायता समूहांना सदर राज्यस्तरीय पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट स्वयंसहायता समूह पुरस्कार पाचव्यांदा तालुक्याला प्राप्त झालेला आहे. या स्वयंसहायता समूहाने गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, पशुधन विकास कार्यक्रम, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, भात पिकातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, स्वच्छ स्वयंपाकगृह, प्रत्येक घरी स्वच्छता गृह उभारणे इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. दोन लाख रुपये कर्ज घेऊन शेळी पालन व दुग्ध व्यवसाय वाढीस लागला आहे. बचत गटास राम कोतवाल, लीला कुऱ्हे, मच्छिंद्र मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
.......
बायफ संस्थेमुळे जीवन चरितार्थासाठी होणारा संघर्ष व रोजंदारीसाठी स्थलांतर थांबले आहे. पुरस्कारापेक्षा महत्त्वाचे आहे की माणूस म्हणून आम्ही समाजासाठी गटाच्या माध्यमातून मोठे योगदान देऊ शकतो.
- सुनंदा भोईर, अध्यक्षा, महालक्ष्मी मातोश्री महिला बचत गट
..........
बायफ संस्थेच्या माध्यमाने अकोले तालुक्यामध्ये महिला बचत गटांचे मोठे नेटवर्क उभे करता आले. बचत गटांच्या माध्यमाने बायफचे आदिवासी भागातील विकास कार्य अधिक गतिमान झाले आहे. राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील बचत गटांना पाचव्यांदा मिळत आहे.
- जितीन साठे, विभागीय अधिकारी बायफ