नगर शहर व उपनगरात घरकाम करणाऱ्या ८ ते १० हजार महिला आहेत. कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढल्यापासून बहुतांशी महिलांचे घरोघरी जाऊन काम करणे बंद झाले आहे. हातावर पोट असलेल्या या महिलांचे पती रिक्षाचालक, ट्रकचालक, हॉटेलमध्ये काम, मजुरी, हमाली अशी छोटे-मोठे कामे करून उपजीविका भागवितात. यातील बहुतांशी जणांचे काम आहे सध्या बंद आहेत.
............
एका घरातून मिळतात ६०० रुपये
एक मोलकरीण दिवसभरात साधारणतः सहा ते सात घरांत धुणी-भांडी व झाडूपोछाचे काम करते. या महिलेला एका घरातून महिन्याला पाचशे ते सहाशे रुपये मिळतात. तिची हीच कमाई कुटुंबासाठी मोठा आधार ठरते. काम बंद झाल्याने बहुतांशी महिलांच्या घरातील अर्थचक्र बिघडले आहे.
...........
नगर शहरात घर काम करणाऱ्या महिलांची ८ ते १० हजारपेक्षा जास्त संख्या आहे. तसेच असंघटित कामगार या घटकात या महिला येतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकाम करणाऱ्या या महिलांवर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. शासनाने या अडचणीच्या काळात प्रत्येक कामगार कुटुंबाला आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
-विलास कराळे, अध्यक्ष, जिल्हा श्रमिक असंघटित कामगार संघटना
.............
मी घरोघरी जाऊन धुणी-भांडी व इतर घरकाम करत होते. पहिल्यांदा लॉकडाऊन झाले तेव्हा काम बंद झाले. आता पुन्हा कोरोना वाढल्यामुळे घर कामे बंद झाली आहेत. आठ जणांचे कुटुंब आहे. उपजीविका कशी भागवावी, असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शासनाने आम्हाला मदत करणे गरजेचे आहे.
- अशा वऱ्हाडे, घरकाम करणारी महिला
................