नेवासा न्यायालयात सोमवारी आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाप्रसंगी ‘मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर व वाढ’ या विषयावर मार्गदर्शन करताना थावरे बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या.एस.एम.तापकिरे, दुसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या.जी.बी. जाधव, वरिष्ठ स्तर न्या. बी.यू. चौधरी, न्या.एस.डी.सोनी, न्या.जे.आर.मुलाणी, कनिष्ठ स्तर न्या.ए.बी.निवारे, न्या.पी.व्ही.राऊत, न्या.ए.ए.पाचरणे उपस्थित होते.
प्रा.थावरे म्हणाल्या, सध्या भाषेची सर्रास सरमिसळ होताना दिसते. हिंदी,इंग्रजी मिश्रित भाषेमुळे ना धड मराठी, ना धड इंग्रजी अशी मधली अवस्था झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संस्कार वाढवण्याची जबाबदारी आता पालकांवरच जास्त आहे.
न्या. बी.यू.चौधरी म्हणाले, न्यायालयीन भाषा मराठी असल्याने न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर वाढतो आहे, ही जमेची बाजू आहे.
न्या. तापकिरे म्हणाले, मराठी भाषा संवर्धनासाठी न्यायाधीश व वकिलांनी मिळून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी भाषा ही समृद्ध, सोपी व लौकिक असलेली भाषा असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
स्वागत व प्रास्ताविक ॲड. के. एच. वाखुरे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक एस.जे.लामदाडे, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे अधीक्षक आर.व्ही.वाव्हळ, एस. एस. उलाणे, माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत भालेराव, के. बी. वाडकर, वकील व इतर कर्मचारी उपस्थित होते.
...
१७नेवासा कोर्ट
..
ओळी-नेवासा न्यायालयात सोमवारी आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. मंदा थावरे.