मळगंगा ट्रस्टची सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:57+5:302021-02-24T04:21:57+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकरराव कवाद हे होते. सचिव शांताराम कळसकर यांनी ट्रस्टच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. यावेळी विजया ...
सभेच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकरराव कवाद हे होते. सचिव शांताराम कळसकर यांनी ट्रस्टच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. यावेळी विजया ढवळे, शेखर लंके, प्राचार्य एस.के.आहेर, राहुल रसाळ, ज्ञानेश्वर लामखडे यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.बबन सोनवणे, प्रा.ज्ञानेश्वर कवाद, प्रा.अनंतराव वरखडे, विठ्ठलराव वराळ, सोमनाथ वरखडे, राजेंद्र लाळगे यांनी आपले विचार मांडले. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकरराव कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, रामदास वरखडे, ठकाराम लंके, माउली वरखडे, भास्कर कवाद, नामदेव थोरात, वसंतराव कवाद, अॕॅड.बाळासाहेब लामखडे, बबन ससाणे, बबनराव तनपुरे, रमेश ढवळे, विश्वास शेटे, शंकर लामखडे, दत्तात्रय लाळगे, मंगेश लंके, दत्तात्रय भुकन, काळुराम गजरे, बबन ढवण, सुनील पवार, ठकाराम गायखे, दत्ताजी लंके, विकास लंके, अनिल लंके, संतोष रसाळ व निघोज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.....
लंके, औटी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
निघोज येथे मळगंगा देवीचे भक्त निवास व एमपीएससी व युपीएससी अभ्यासक्रमासाठी सुसज्ज इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल आ.निलेश लंके व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनीही यापूर्वी भरीव निधी दिला असल्याने दोघांचाही अभिनंदन प्रस्ताव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.