बिनविरोध निवडणूकीसाठी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून  काम करणार- अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 03:43 PM2020-12-19T15:43:34+5:302020-12-19T15:44:04+5:30

बिनविरोधरोध निवडणूकांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून  मी काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे बोलताना जाहिर केले.

MLA Nilesh Lanka to act as campaigner for unopposed elections: Anna Hazare | बिनविरोध निवडणूकीसाठी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून  काम करणार- अण्णा हजारे

बिनविरोध निवडणूकीसाठी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून  काम करणार- अण्णा हजारे

पारनेर :  आज प्रत्येक गावात, शहरात, देशात जाती, पाती, धर्म, वंश यावरून वाद निर्माण होत असून पक्ष व पाटर्यांमधील व्देश भावनाही वाढत चालली आहे. त्यामागे निवडणूका हेच कारण आहे.

देशातील व्देशभावना कमी करायची असेल तर आ. निलेश लंके यांनी उचचलेेले पाऊल अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही बजबूत झाली पहिजे, प्रबळ झाली पाहिजे. ती दिल्लीतून, मुंबईतून होणार नाही तर गल्ली बदलल्याशिवाय दिल्ली बदलणार नाही. त्याचसाठी

बिनविरोधरोध निवडणूकांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून  मी काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे बोलताना जाहिर केले.

पारनेर - नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून त्या त्या गावांतील नागरीकांनी बिनविरोध निवडणूक करावी, आमदार निधीमधून त्या गावांना २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी केली आहे. निवडणूका बिनविरोध करण्यासाठी आ. लंके हे स्वतः विविध गावांच्या बैठका घेत असून शुक्रवारी सुपे गटातील बैठकांदरम्यान राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्‍वभुमिवर शनिवारी सकाळी आ. नीलेश लंके यांनी राळेगणसिद्धीत जाउन हजारे यांची भेट घेतली. बिनविरोध निवडणूकांदर्भातील माहीती  त्यांनी हजारे यांना दिली. यावेळी बोलताना हजारे यांनी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी राळेगणसिद्धीचा आदर्श घेण्याचा आवाहन केले.

देश संकटातून चालला आहे 
यावेळी बोलताना हजारे म्हणाले, आ. लंके यांनी उचललेले हे पाऊल गावापुतं मर्यादीत नाही. आपली दृष्टी दुर केली पाहिजे.  आमची लोकशाही बळकट व्हावी, मजबुत व्हावी अशा दृष्टीने उचललेलं हे पाऊल आहे. आपण मर्यादीत विचार करतो. देशासाठी, समाजासाठी दुरदृष्टी हवी.  आपण रोज वर्तमानपत्रे वाचतो, देश एका संकटातून चालला आहे. जाती, पाती, धर्म, वंश यांच्यातील व्देश भावना वाढत आहे. शेजाऱ्या शेजाऱ्यांमध्ये मतभेद होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत. दोन पक्ष व पार्ट्यांमध्ये वाद आहेत. काय चाललंय बिहारमध्ये ? काय चाललंच बंगालमध्ये ? कशामुळे ? तर निवडणूकांमुळे. राजकिय व्देश, पक्ष व पार्ट्यांमधील व्देश हे वाढत असून देशाल  हा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल तर आ. लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमास गावागावातून प्रतिसाद मिळाला पाहिजे.  तसे  झाले तर ते तालुक्याचे उदाहरण होईल. महाराष्ट्राला दिशा मिळेल. महाराष्ट्राला दिशा मिळाली तर देशातील अनेक राज्ये त्याचं अनुकरण करतील असा विश्‍वास हजारे यांनी व्यक्त केला.

लोकशाहीसाठी आ. लंके यांचे प्रयत्न

१८५७ ते १९४७ या ९० वर्षात जी बलीदानं झाली ती कशासाठी ?  आमच्यासाठीच ना ? भगतसिग, राजगुरू, सुखदेव हे फासावर गेले ते कशासाठी तर आमच्या स्वातंत्रयासाठी. काय स्वप्न होतं त्यांचं ? इंग्रजांना घालवायचं व या देशात लोकशाही आणायची.  मात्र घडलं काय ? इंग्रज गेला पण लोकशाही आली नाही. ती लोकशाही यावी या दृष्टीने आ. लंके यांनी जो प्रयत्न चालविला आहे तो मला महत्वाचा वाटतो.

स्वतः साठी नाही समाजासाठी, गावासाठी काम केलं 
कोण सरपंच झाला, कोण आमदार, खासदार झाला याच्याशी मला कर्तव्य नाही. परंतू लोकशाही मजबूत होण्यासाठी उचललेलं पाउल मला महत्वाचंं वाटतं.  मी ५० वर्षे गावात काम केले. त्यात माझा काय लाभ आहे ? मला काही मिळवायचं नव्हतं. लोकांकडून काही मागायचं नव्हतं. जे केलं ते गावासाठी समाजासाठी केलं. 

निवडणुकांमुळे विकास खुंटला 

गांधीजी सांगत गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही. आधी गावच बदलावं लागेल. आज खेडयांतील विकास थांबला आहे तो निवडणूकांमुळे. राजकीय गट, तटामुळे विकास थांबला. एका निवडणूकीतील मतभेदाचे लोण पाच वर्षेे राहते.  त्यामुळेच आ. लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे लोकशाही मजबूत होईल. प्रत्येक गावातील व्देश भावना कमी होणे गरजेचे आहे. गट, तट, राजकारण थांबले पाहिजे. लोकशाहीत निवडणूक करणे दोष नाही. परंतू सत्ता व पैसा हा निवडणूकीतील दोष असून लोक त्यात अडकले आहेत. त्यासाठीच बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे आहे. 

बिनविरोध निवडणुकांमुळे राळेगणचा विकास
     
     राळेगणसिद्धीत ५० वर्षात २ ते ३ निवडणूका झाल्या. त्यामुळेच येथे विकास झाला. त्यामुळेच येथील नागरीक गावाला परिवार माणतात. असेच प्रत्येक गावागावांत व्हावं अशी आमदार लंके यांची इच्छा आहे. त्यांच्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा आहेत. बिनविरोध निवडणूका करण्यासाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून मी काम करेल असेही हजारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

किती दिवस संघर्ष करायचा ?

     आ. लंके यांनी आपसांतील व्देश, मतभेद दुर ठेवण्याचे आवाहन केले. आपला तालुका वेगळया उंचीवर आहे. आपण एकमेकांत का लढायचं ? आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत, सुख दुःखात सहभागी होतो मग मनात कटूता का ठेवायची ? कीती दिवस संघर्ष करायचा ? आपण अण्णांच्या सहवासात राहतो. त्यांचा गुण आपण घेतला पाहिजे. गट, तट, पक्ष, पाटर्या न पाहता आपल्या कुटूंबाचाच एक भाग म्हणून आपण निवडणूका बिनविरोध करू अशी साद आ. लंके यांनी यावेळी बोलताना घातली. सुरेश पठारे यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग मापारी, लाभेश औटी यांचीही यावेळी भाषणे झाली.

     यावेळी माजी सरपंच सदाशिव मापारी, माजी सभापती सुदाम पवार, वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, दत्ता आवारी, किसन मापारी, किसन पठारे, भाउ गाजरे, मेजर दादा पठारे, गिताराम औटी,  रामहरी भोसले, सौ. विजया पठारे, गणेश हजारे, अनिल उगले, रूपेश फटांगडे, रोहिदास पठारे, दादा गाजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: MLA Nilesh Lanka to act as campaigner for unopposed elections: Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.