कोविड रुग्णालयात खासदारांनी उभारली आरोग्याची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:49+5:302021-04-14T04:18:49+5:30
गुढीपाडव्याचे औचित्य साधून खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील कोविड रुग्णालयास भेट दिली. कोविड सेंटरमध्ये आरोग्याची गुढी उभारली. ...
गुढीपाडव्याचे औचित्य साधून खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील कोविड रुग्णालयास भेट दिली. कोविड सेंटरमध्ये आरोग्याची गुढी उभारली. शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, साई संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षिका मैथिली पीतांबरे, डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. संजय गायकवाड, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर उपस्थित होते.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मनावर या संकटाची भीती कायम आहे. पारंपरिक सण असूनही कुटुंबीयांसमवेत साजरा करता येऊ शकत नाही. या दु:खाचा ओलावा या रुग्णांना जाणवू नये म्हणूनच खासदार विखे यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करून काही काळ काविड रुग्णालयात घालून त्यांना दिलासा दिला. यावेळी खासदार विखे यांच्यासह उपस्थितांनी रुग्णांना जेवण वाढून पाडवा सणाचा आनंदही द्विगुणित केला.